Abhishek Porel Video : IPL पूर्वी मैदानावर ‘डॉग शो’! अभिषेक पोरेलने कुत्र्याला कडेवर उचललं अन्….VIDEO होतोय व्हायरल
Abhishek Porel Video : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा थरार २८ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, त्याआधीच चाहत्यांना मनोरंजनाचा डोस मिळायला सुरुवात झाली आहे.

Abhishek Porel Dog Video Delhi Capitals : आयपीएल २०२६ चा महासंग्राम सुरू होण्यासाठी आता २४ तासांपेक्षाही कमी वेळ उरला आहे. मैदानावर चौकार-षटकारांची आतिशबाजी सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एका मजेशीर व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रादरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा थरार २८ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, त्याआधीच चाहत्यांना मनोरंजनाचा डोस मिळायला सुरुवात झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या अंतर्गत सराव सत्रादरम्यान अचानक एक कुत्रा खेळपट्टीवर धावत आला. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या अभिषेक पोरेलने कोणतीही भीती न बाळगता अत्यंत शांतपणे त्या कुत्र्याला आपल्या कडेवर उचलले आणि सुरक्षितपणे सीमारेषेबाहेर नेऊन सोडले.
खेळाडू आणि स्टाफमध्ये हास्यकल्लोळ –
It was playtime, and Abi obliged 🥹💙 pic.twitter.com/0ClsG4QIkM
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 27, 2026
अभिषेक पोरेलच्या या कृतीमुळे मैदानावर उपस्थित असलेले इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. कुत्र्याला बाहेर सोडल्यानंतर पुन्हा सराव सत्र सुरळीत सुरू झाले. या गोड प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून पोरेलच्या कृतीचे कौतुक होत आहे.
आयपीएल २०२६ चे पूर्ण वेळापत्रक जाहीर –
एकीकडे मैदानावर ही मज्जा सुरू असताना, दुसरीकडे बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १३ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत लीग टप्प्यातील उर्वरित ५० सामने देशातील १२ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. यामध्ये बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगड या शहरांचा समावेश आहे.





