अभिषेक बच्चनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; फर्स्ट लुक समोर

Abhishek Bachchan New Film | बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘बी हॅप्पी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. निर्मात्यांनी याचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. अभिषेक बच्चनच्या ‘बी हॅप्पी’ चित्रपटाचे पोस्टर प्राइम व्हिडिओच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अभिषेक आणि इनायतचा फोटो दिसत आहे. यामध्ये बाप-लेकीची जोडी डान्स करताना दिसत आहे. लियाना डिसूझा, नोरा फतेही, इनायत वर्मा, जॉनी लीव्हर आणि हरलीन सेठी यांसारखे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.
View this post on Instagram
हा चित्रपट रेमो डिसूझा दिग्दर्शित करत असून रेमो डिसूझाच्या प्रोडक्शन कंपनीची निर्मिती आहे. पोस्टरमध्ये अभिषेक बच्चनसोबत एक मुलगी दिसत असून तो तिच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. अभिषेकच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. Abhishek Bachchan New Film |
दरम्यान, अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटात सैयामी खेर अभिषेकसोबत दिसली होती. त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता अभिषेकची जादू आगामी चित्रपटात पाहायला मिळणार का? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.





