रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित चित्रपटात झळकणार अभिषेक बच्चन, ‘बी हॅप्पी’चा मजेशीर ट्रेलर रिलीज

Be Happy Movie Trailer | अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिषेकच्या मागील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरीही त्याच्या भूमिकांचे कौतुक झाले. आता लवकरच अभिनेता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेकच्या ‘बी-हॅप्पी’ या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे.
डान्स रिअॅलिटी शोवर आधारित ‘बी-हॅप्पी’ या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच नोरा फतेहीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक डान्सची आवड असलेल्या एका मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
अॅमेझॉन प्राइम व्हीडिओकडून चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 2 मिनिटांच्या या मजेशीर ट्रेलरमध्ये बाप-लेकीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. मुलीच्या नृत्याचे स्वप्न बाप कशाप्रकारे पूर्ण करतो, याची कहाणी या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या मजेशीर ट्रेलरला प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. ट्रेलरपाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
‘बी-हॅप्पी’ हा चित्रपट 14 मार्चला ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हीडिओवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डान्स मास्टर आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाने केले आहे. याआधी रेमो डिसूझाने ‘एबीसीडी: एनी बॉडी कॅन डान्स’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ यांसारखे डान्सवर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी आणले होते. आता रेमो डिसूझाचा ‘बी-हॅप्पी’ हा आणखी एक डान्सवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.





