अभिनय बेर्डेला अनोळखी व्यक्तीकडून शिवीगाळ; शेअर केला स्क्रीनशॉट

Abhinay Berde : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अभिनय बेर्डेने अल्पावधीतच मोठे यश संपादन केले आहे. ‘ती सध्या काय करते?’ हा त्याचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले होते. मात्र सध्या अभिनय त्याच्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अभिनयला एका नेटकऱ्याने खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. त्यावर संताप व्यक्त केला आहे.
अभिनयने शेअर केलेल्या स्क्रीन शॉटमध्ये या ट्रोलरने त्याला अपशब्द वापरल्याचं दिसून येत आहे. या अकाऊंटच्या डिपीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. मात्र, त्याचं वर्तन या फोटोला शोभणारं मुळीत नाही. अभिनयने त्याच्या मेसेजचा स्क्रिनशॉट त्याच्या स्टोरीवर शेअर केला आहे. यावर त्याने त्या नेटकऱ्याला कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

दरम्यान, कलाविश्वात अनेक कलाकरांना सध्या सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. याचा सामना आता अभिनयला देखील करावा लागला आहे. अभिनयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘ती सध्या काय करते’ सह अभिनय ‘बांबू’, ‘मन कस्तूरी रे’, ‘बॉईज ४’ यांसारख्या सिनेमातही झळकला आहे.





