अब्दुल सत्तार-मनोज जरांगे यांच्यात पहाटेपर्यंत चर्चा ; देवेंद्र फडणवीसांशीही साधला संवाद, वाचा काय झाली चर्चा

Abdul Sattar-Manoj Jarange Meeting । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापल्या परीने ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्यातच राज्यात मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यात भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान , मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तर यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल 3 तास चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. चर्चे दरम्यान मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली असल्याचे म्हटले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत काही ना काहीतरी तोडगा काढावा लागेल असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या, आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मंत्रीमंडळ बैठक Abdul Sattar-Manoj Jarange Meeting ।
मंत्री अब्दुल सत्तार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यामध्ये पहाटे अडीच वाजेपर्यंत तीन तास चर्चा झाली. शेतकऱ्यांच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी, यासह मराठा आरक्षणासच्या मागणीपबाबत चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले. याशिवाय चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसानीवर देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाल्याचा मनोज जरांगे यांनी सांगितले. दरम्यान सरकारकडे आता केवळ 60 दिवस उरले आहेत. मनोज जरांगे यांनी केलेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्र्यांशी बातचीत करणार आहे. आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.
अतिवृष्टीमुळं अनेक भागात शेती पिकांना मोठा फटका Abdul Sattar-Manoj Jarange Meeting ।
दरम्यान , मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. तसेच अतिवृष्टीमुळं अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहे. त्यामुळं नकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, त्यांनी तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली.
त्यातच आज मुंबईत मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा होणार असल्याची माहिती सत्ताक यांनी दिली आहे. त्यामुळं यावर आज काय तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.





