छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी अब्दुल सत्तार; संदिपान भुमरे यांचा राजीनामा

छत्रपती संभाजीनगर – शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संदिपान भुमरे यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून अब्दुल सत्तार आता नवे पालकमंत्री असतील.
शिवसेनेचे नेते संदिपान भूमरे यांची खासदारपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचाही राजीनामा त्यांनी दिला.
शिवसेनेचे नेते संदिपान भूमरे यांची खासदारपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचाही राजीनामा त्यांनी दिला.
संदिपान भूमरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. पण पालकमंत्रिपदाचा अद्याप राजीनामा दिला नव्हता. आता त्यांनी पालकमंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे.