Haldwani violence: हल्दवानी हिंसाचारातील मास्टरमाईंड अब्दुल मलिकला अटक

Haldwani violence: उत्तराखंडमधील हल्दवानी जिल्ह्यातील बनभुलपुरा येथे 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या मास्टरमाइंड अखेर पोलिसांनी पकडले आहे. हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. हिंसाचारानंतर आरोपी फरार झाला होता, त्याच्यासाठी अनेक पोलिस पथके कार्यरत होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध लुकआउट नोटीसही जारी केली होती, अशी माहिती उत्तराखंड पोलिसांचे प्रवक्ते आयजी नीलेश भरणे यांनी दिली आहे.
आरोपी अब्दुल मलिकने हल्दवानी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जही दाखल केला असून त्यावर 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधी पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे. आरोपीच्या वकिलाने सांगितले की, अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली, मलिकचा हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. या हिंसाचाराच्या तीन-चार दिवसांपूर्वी तो हल्द्वानीतून बाहेर पडला होता.
अब्दुल मलिकची राजकीय पार्श्वभूमी
बलभुनपुरा हिंसाचाराचा मुख्य आरोपी आणि सूत्रधार याने अमाप संपत्ती जमा केली आहे. प्रचंड पैसा जमवल्यानंतर मलिकने नेता बनण्याचे स्वप्न पाहिले. 2004 साली बसपाकडून तिकीट मिळवून त्यांनी फरिदाबादमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नामांकनाच्या शेवटच्या दिवशी मलिक यांना तिकीट मिळाले आणि उमेदवारी दाखल करताना त्यांच्यासोबत 100 लोकांची टीम होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्या वर्षी काँग्रेसने या जागेवरून विजय मिळवला होता. त्यावेळी फरिदाबाद लोकसभा मतदारसंघात मेवातचाही समावेश होता.
काय आहे हल्दवानी प्रकरण ?
उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी येथील बनभुलपुरा भागात (दि.8) हल्दवणी येथील बनभुळपुरा भागात महापालिकेने जेसीबी मशिन लावून बेकायदा मदरसा व नमाजची जागा जमीनदोस्त केली. बेकायदा मशीद व मदरशावर प्रशासनाचा बुलडोझर फिरताच तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त जमावाने अनेक वाहने पेटवून दिली. तसेच जेसीबीचीही तोडफोड केली. यानंतर परिसरात निर्माण झालेली हिंसक परिस्थिती पाहता कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
शहरात दंगल उसळली –
मलिकवर “बेकायदेशीर रचना” बांधल्याचा आरोप आहे, ज्याला हटवल्यानंतर शहरात हिंसाचार भडकला. या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले होते, ज्यात अनेक पोलिस आणि मीडिया लोकांचा समावेश होता. हिंसाचाराच्या दिवशी (8 फेब्रुवारी) शहरात दंगल उसळली, त्यानंतर पोलीस दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला आणि पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली. मदरसा आणि नमाजासाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतीच्या विध्वंसानंतर झालेल्या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. या प्रकरणाचा मास्टमाईंड अब्दुल मलिक असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.





