Abbas Araghchi : युद्ध थांबवण्यासाठी राजनैतिक मार्ग हा एकमेव मार्ग; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केले स्पष्ट
अमेरिकेसोबतच्या संघर्षावर कोणताही लष्करी किंवा निर्बंधांवर आधारित तोडगा नाही, असे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांनी ठामपणे सांगितले असून, हा संघर्ष संपवण्यासाठी राजनैतिक मार्ग हाच एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे.

Abbas Araghchi : अमेरिकेसोबतच्या संघर्षावर कोणताही लष्करी किंवा निर्बंधांवर आधारित तोडगा नाही, असे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांनी ठामपणे सांगितले असून, हा संघर्ष संपवण्यासाठी राजनैतिक मार्ग हाच एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे.
आज तेहरानमध्ये विविध देशांचे राजदूत आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी अमेरिका शहाणपण आणि विवेकबुद्धीचा अवलंब करेल. अशी आशा अराघची (Abbas Araghchi) यांनी व्यक्त केली. तसेच, जर अमेरिकेने लष्करी मार्गाचा अवलंब केला, तर इराण पूर्वीपेक्षा अधिक तयार आहे, असे ठामपणे सांगितले.
या संघर्षासंदर्भात सुरू असलेला तणाव आणि इराणवरील वाढता आर्थिक दबाव या पार्श्वभूमीवर अराघची यांनी ही टिप्पणी केली आहे.दरम्यान इराणसोबतचे युद्ध खूप लवकर संपेल आणि संघर्ष संपल्यानंतर तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरतील, असा अंदाजही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवला आहे. त्यांनी इराणवर तीव्र लष्करी आणि आर्थिक दबाव असल्याचेही नमूद केले.
गाझामध्ये इस्रायलचे पुन्हा हल्ले
गाझामध्ये रविवारी सकाळी एका वाहनावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात एक पॅलेस्टिनी ठार झाला आणि किमान ११ जण जखमी झाले. या हल्ल्यात हमासच्या एका कुख्यात दहशतवाद्याला लक्ष्य (Abbas Araghchi) करण्यात आले होते, असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले.
गेल्या महिन्याभरात गाझामधील पॅलेस्टिनींवर इस्रायलचे हल्ले वाढले आहेत. जवळपास वर्षभरापूर्वी हमाससोबत युद्धविराम झाल्यापासून, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये गाझामध्ये किमान १,४४५ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
हौथींकडून येमेनच्या राजधानीवर हल्ले
काल मध्यरात्रीच्या सुमारास येमेनची राजधानी सनावर हवाई हल्ले झाले. सौदी अरेबिया आणि येमेन सरकारविरुद्ध पुन्हा सुरू झालेल्या युद्धात हे हल्ले केल्याचा दावा हौथी बंडखोरांनी केला आहे. सौदी अरेबियानेही हौथींच्या ठिकाणांवर मारा केल्याचा आरोप हौथींकडून करण्यात आला आहे.
पण या हल्ल्यांचा कोणताही पुरावा दिला गेलेला नाही. या हल्ल्यांबाबत सौदी अरेबियाकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. मात्र येमेन सरकारच्या सैन्याने हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
होर्मुझमध्ये पुन्हा टँकरवर हल्ला
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका टँकरवर झालेल्या प्रोजेक्टाईलच्या माऱ्यात इंजिन रूमचे नुकसान झाले, असे ब्रिटनच्या सागरी व्यापारी व्यवहार केंद्राने म्हटले आहे. हा हल्ला कोणी केला, तसेच तो केव्हा करण्यात आला, हे तात्काळ स्पष्ट झाले नाही. पण टँकरवरील कर्मचारी सुरक्षित असल्याचे समजले आहे.
इराणविरोधात इस्रायल आणि अमेरिकेचे युद्ध सुरू झाले, तेंव्हापासून होर्मुझची सामुद्रधुनी बहुतांश बंदच आहे. आखातील बहुतेक देशांकडून पाइपलाईनद्वारे तेल निर्यात करण्यास इतर अनेक देशांनी (Abbas Araghchi) अनुमती दिली आहे.






