Abbas Araghchi: “लारीजानींच्या मृत्यूने काही फरक पडत नाही…” ; अराघची यांनी पुन्हा अमेरिका अन् इस्रायलला दिला इशारा
Abbas Araghchi: इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांच्या निधनानंतर, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आता आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Abbas Araghchi: इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांच्या निधनानंतर, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आता आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अराघची यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिका आणि इस्रायलला त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी “लारीजानींसारख्या एका प्रमुख व्यक्तीच्या निधनाचा इराणच्या सरकारवर किंवा व्यवस्थेवर परिणाम होणार नाही.”असे म्हटले आहे.
अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतरही इराणची व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत आहे.असे म्हणत त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला इराणला कोणतंही फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे.
इराणची व्यवस्था एकाच नेतृत्वावर अवलंबून नाही Abbas Araghchi:
अराघची म्हणाले, “मला समजत नाही की अमेरिका आणि इस्रायलला हे अद्याप का समजले नाही. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची राजकीय रचना खूप मजबूत आहे. येथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संस्था सुस्थापित आहेत.”
अब्बास अराघची यांनी पुढे जोर देऊन सांगितले, “एका व्यक्तीच्या येण्याने किंवा जाण्याने संपूर्ण व्यवस्था हादरत नाही. होय, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची भूमिका असते. काही जण चांगले काम करतात, काही कमी, पण वस्तुस्थिती ही आहे की इराणची राजकीय व्यवस्था एका अतिशय भक्कम आणि मजबूत रचनेवर आधारित आहे.”
अब्बास अराघची यांनी हे देखील आठवण करून दिली की, “सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणची व्यवस्था अढळ राहिली आहे, कारण ती केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर मजबूत संस्थांवर चालते.”असे म्हटले.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
अली लारीजानी यांच्यावरील हल्ला हा इराणवरून अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील मोठ्या संघर्षाचा एक भाग आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी खामेनी यांच्या हत्येनंतर, लारीजानी हे आता लक्ष्य बनलेले सर्वात वरिष्ठ इराणी नेते आहेत.
इस्रायलचा दावा आहे की, लारीजानी हे इराणच्या सुरक्षा धोरणाचे शिल्पकार होते आणि त्यांनी इराणच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी आणि आता लारीजानी असे इराणला आतापर्यंत दोन मोठे धक्के बसले आहेत.
देशाची धोरणे बदलणार नाहीत Abbas Araghchi:
असे असूनही, परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यातून इराणच्या सामर्थ्याचा संदेश जातो. अराघची यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशाची व्यवस्था एक किंवा दोन व्यक्तींवर अवलंबून नाही आणि ती पूर्णपणे स्थिर आहे. सध्या इराण-इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचला असून, दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू आहेत.
इराण इस्रायलवरही हल्ले करत असून, परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा जगभरातून इराणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
अराघची यांची मुलाखत हा इराणी सरकारकडून एक स्पष्ट संदेश आहे की, प्रमुख नेत्यांच्या हत्या होत असल्या तरी देशाची व्यवस्था आणि धोरणे बदलणार नाहीत.






