Aashka Goradia : टीव्ही अभिनेत्री आश्का गोराडिया ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा झाली आई
Aashka Goradia : आश्का गोराडिया आणि ब्रेंट गोबल यांनी २०१७ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रीतीरिवाजांनी लग्न केले होते.

Aashka Goradia : टीव्ही अभिनेत्री आश्का गोराडिया वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. आश्काने डिसेंबर महिन्यात बेबी बंपचा फोटो पोस्ट करत ती व तिचा पती अमेरिकन बिझनेसमन ब्रेंट गोबल लवकरच दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं सांगितलं होतं.
आश्का गोराडियाला पहिला मुलगा आहे. आता तिला दुसराही मुलगाच झाला असून त्यांनी दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. त्याचे नाव रिचर्ड थियोडोर गोबल असे ठेवले आहे. “आम्हाला तुम्हा सर्वांना सांगताना अत्यंत आनंद होतोय की १ मे २०२६ रोजी आमच्या आयुष्यात ‘रिचर्ड थिओडोर गोबल’ आला. आणखी एका मुलाच्या जन्मामुळे, विल्यम अलेक्झांडरला आता भाऊ मिळाला आहे,” असं आश्का गोरडियाने इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Asaduddin Owaisi: बुरखा, नकाब आणि एक धार्मिक पुस्तक कधीपासून अवैध झाले? असदुद्दीन ओवेसींचा सवाल
आश्का गोराडियाच्या मालिका
आश्काच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने २००२ मध्ये ‘अचानक 37 साल बाद’ या शोमधून टीव्हीवर पदार्पण केले होते. नंतर तिने ‘भाभी’, ‘तुम बिन जाना कहाँ’ सारख्या शोमध्ये काम केले. २००३ मध्ये एकता कपूरच्या ‘कुसुम’ शोमुळे ती घराघरात पोहोचली. मग तिने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘नागिन’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं.
View this post on Instagram
ती शेवटची २०१९ मध्ये ‘डायन’ मालिकेत झळकली होती. मात्र, २०२१ मध्ये अभिनय क्षेत्र सोडून आशकाने आपला व्यवसाय सुरू केला. मेकअप आणि कॉस्मेटिक्सच्या क्षेत्रात तिने स्वतःची कंपनी स्थापन केली. आता तिचा हा व्यवसाय १२०० कोटी रुपयांचा झाला आहे.
आश्का गोराडिया आणि ब्रेंट गोबल यांनी २०१७ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रीतीरिवाजांनी लग्न केले होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये मुलगा विलियम अलेक्झांडरच्या जन्मानंतर ते पहिल्यांदा आई-बाबा बनले होते. ब्रेंट गोबल मूळचा अमेरिकेचे रहिवासी असून ते एक प्रसिद्ध योग शिक्षक आहेत. Aashka Goradia
हेही वाचा:
Vivek Oberoi post : “अजित दादांचं अस्तित्व, त्यांचं नाव…” विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवारांसाठी पोस्ट






