Jamkhed News : समाजोपयोगी उपक्रमांतून ‘आरंभ फाउंडेशन’ने नावलौकिक प्राप्त केला : सागर महाराज कुमटकर
Jamkhed News : आरंभ फाउंडेशन केवळ उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र जोडण्याचे आणि गरजूंना मदतीचा हात देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.

Jamkhed News : “आरंभ फाउंडेशन केवळ उत्सव साजरा न करता त्यातून समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे आणि मदतीचा हात देण्याचे कार्य करत आहे. अशा विविध उपक्रमांतूनच आरंभ फाउंडेशनने जामखेड शहरासह संपूर्ण जिल्हाभरात स्वतःचा एक वेगळा नावलौकिक प्राप्त केला आहे,” असे प्रतिपादन चौभेवाडी येथील ह.भ.प. सागर महाराज कुमटकर यांनी केले. (Jamkhed News)
सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि समाजसेवेचा वसा जपणार्या ‘आरंभ फाउंडेशन’च्या वतीने यंदाची कोजागिरी पौर्णिमा अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. चौभेवाडी येथील ह.भ.प. सागर महाराज कुमटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. (Jamkhed News)
यावेळी माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हर्षल डोके, अमोल फंदाडे, बापूसाहेब कार्ले, विशाल आब्दुले, विशाल लोहकरे, संकेत ढाळे, सागर अष्टेकर, सुनील जगताप, बापूसाहेब जगताप यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्व उपस्थितांना मसाला दूध व अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. (Jamkhed News)
गेल्या चार वर्षांपासून आरंभ फाउंडेशनने
शहरात व परिसरात अनेक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही संस्था सामाजिक, शैक्षणिक व बहुजन हिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या स्नेहमेळाव्यात मान्यवरांनी फाउंडेशनच्या या उल्लेखनीय सामाजिक प्रवासाचा मनमोकळा गौरव केला. (Jamkhed News)
चंद्राच्या शीतल प्रकाशात उपस्थितांनी दुग्धपानाचा आस्वाद घेत एकमेकांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरंभ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकार्यांनी व सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. (Jamkhed News)


