AAP VS ED : केजरीवालांच्या अटकेनंतर आता आमदारांवर छापे.. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

AAP VS ED : आम आदमी पार्टीवरील ईडीची वक्रदृष्टी अजून कायम असून आज पक्षाच्या आणखी एका आमदारावर ईडीने छापे मारी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी दिल्लीचे आप आमदार गुलाबसिंग यादव यांच्या घरावर छापा टाकला.
यावेळी अन्यही आमदारांवर छापेमारीचे सत्र अवलंबले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुलाबसिंग यादव हे दिल्लीच्या मतियाला मतदारसंघातून ‘आप’चे आमदार आहेत. | AAP VS ED
केंद्रीय एजन्सीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणात अटक केल्यानंतर दोन दिवसांनी गुलाब सिंग यांच्या निवासस्थानावर ईडीचा छापा पडला आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते केजरीवालााच्या अटकेने संतप्त असून ते सरकारच्या विरोधात आंदोलन करीत असतानाच त्यांच्या पक्षाच्या आणखी काही आमदारांवर ईडीचे छापा सत्र सुरू केले जात आहे. | AAP VS ED





