‘संसद में भी केजरीवाल तो दिल्ली होगी और खुशहाल…’ ; अरविंद केजरीवाल यांनी फोडला प्रचाराचा नारळ

AAP Slogan । ‘संसद में भी केजरीवाल तो दिल्ली होगी और खुशहाल…” अशा घोषणा देत आम आदमी पक्षाने (आप) लोकसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात केलीय. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडुक प्रचाराचा नारळ फोडला.
दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवत आहे. त्यासाठी ‘आप’ने चार जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्याचवेळी काँग्रेस तीन जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे.
अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील जनतेला आवाहन AAP Slogan ।
आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जनतेला आवाहन करत, “जे तुमचे काम आणि दिल्लीचा विकास रोखत आहेत त्यांना ओळखा, त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा द्या.” असे त्यांनी म्हटलं. तसेच ‘तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घेणाऱ्या आणि या लोकांपासून नेहमीच तुमचे रक्षण करणाऱ्या तुमच्या मुलाला यावेळी आशीर्वाद द्या.
‘माझ्या मुलांना मिळालेले शिक्षण प्रत्येकाला मिळाले पाहिजे’
केजरीवाल म्हणाले, “संपूर्ण देशात दोनच राज्ये आहेत जिथे 24 तास वीज असते – ती म्हणजे दिल्ली आणि पंजाब. उर्वरित देशात 7-8 तास वीज कपात केली जाते.” ते पुढे म्हणाले, ‘आज सुरू झालेल्या पॅम्प्लेटचे घरोघरी वाटप करण्यासाठी माझे कार्यकर्ते जातील. दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला माझ्या कुटुंबाला मिळालेले शिक्षण आणि उपचार मिळावेत असा माझा प्रयत्न आहे.’
सातही खासदारांना विजयी करा AAP Slogan ।
अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘तुम्ही मला पहिल्या निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा दिल्या. दुसऱ्यांदा 70 पैकी 62 जागा दिल्या. जनतेने मला बहुमत दिल्याने आज मी त्यांच्याशी (भाजप) लढू शकलो आहे. दिल्लीने मला 70 पैकी फक्त 40 जागा दिल्या असत्या तर भाजपने अडचणी निर्माण केल्या असत्या. अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘तुम्ही विधानसभेत जसा पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा लोकसभेतही द्या. तुमच्यासाठी सात खासदार उभे करा, ते तुमची सर्व कामे करून देतील. भाजपचे सातही खासदार जिंकले तर तुमचे काम बंद पाडण्याचे काम करतात.





