aamir khan son – फिल्म इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लेक जुनैद खान सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी चर्चेत आहे. जुनैद खान YRF च्या ‘महाराज’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री करणार आहे.
जुनेद खान अनेक दिवसांपासून थिएटर करत आहे. अशात आता चर्चा अशी होत आहे की जुनैद आमिर खानची लाडकी एका नाटकात ट्रान्सवुमनची भूमिका साकारताना दिसणार आहे. जुनैद खानचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. रिपोर्टनुसार, जुनैद त्याच्या आगामी ‘स्ट्रिक्टली अनकन्व्हेंशनल’ या नाटकात ट्रान्सवुमनची भूमिका साकारणार आहे. या नाटकाचा पहिला शो १५ नोव्हेंबरला पृथ्वी थिएटर, मुंबई येथे दाखवण्यात येणार.
जुनैद खान या नाटकात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या ट्रान्सवुमन लूकसाठी जुनैद महिलांच्या पोशाखात दिसणार आहे. यासाठी स्टारकिड लांब केसांचा विग घालणार आहे. मात्र, जुनैदच्या दुसऱ्या पात्राबाबत अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही.
जुनैद लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री सई पल्लवी दिसणार आहे. या प्रेमकथेचे शूटिंग सुरू आहे. जुनैदच्या बॉलिवूड डेब्यूबाबत आमिरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘जुनैद जवळपास 15 ऑडिशनमध्ये अपयशी ठरल्यानंतरच त्याला हा चित्रपट मिळाला आहे. यासोबतच आमिरने असेही म्हटले होते की, त्याला आपल्या मुलाला लॉन्च करण्याची इच्छा कधीच नव्हती कारण त्याला विश्वास आहे की, इंडस्ट्रीत टॅलेंटच्या जोरावर कुणीही पुढे जाऊ शकते.’