उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत आमिर खान नाही; बायोपिकमध्ये ‘या’ अभिनेत्याची लागणार वर्णी

Ujjwal Nikam Biopic | प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वपूर्ण अशा अनेक खटल्यात सरकारची योग्यरित्या बाजू मांडली आहे. आता उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित लवकरच बायोपिक येणार आहे. या बायोपिकचं दिग्दर्शन दिनेश विजान करणार आहेत. यात अभिनेता आमिर खान उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणार होता.
मात्र आता या चित्रपटातून त्याचा पत्ता कट झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटापूर्वी आमिरने उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकसाठी होकार दिला होता. परंतू, आता त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे समोर येत आहे.
आता या चित्रपटात एका दमदार अभिनेत्याच्या वर्णी लागणार आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार, दिनेश विजान यांनी राजकुमार रावची उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेसाठी निवड केली आहे. यासंदर्भात दिनेश हे राजकुमार राव चर्चा करणार आहेत.
परंतु सध्या राजकुमार राव दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तो उज्ज्वल निकम यांच्या या बायोपिकसाठी होकार देणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.
दरम्यान, आमिर खान आता उज्ज्वल निकम यांची भुमिका साकारणार नसला तरीही तो या बायोपिकचा भाग राहणार आहे. आमिर खान निर्माता म्हणून या चित्रपटाचा भाग असल्याची चर्चा आहे. Ujjwal Nikam Biopic |
View this post on Instagram
उज्ज्वल निकम यांनी १९९३ चा बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २००८ मधील २६/११ मुंबई हल्ला, २०१६ च्या कोपर्डी बलात्कार प्रकरण अशा अनेक हाय प्रोफाईल प्रकरणात दमदार भूमिका निभावली आहे. कायदेशीर क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २०१६ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले आहे.
हेही वाचा:





