आमिर खानने ड्रीम प्रोजेक्टबद्दल दिली माहिती; ‘महाभारत’मध्ये साकारणार भूमिका?

Aamir Khan | बॉलीवूडचा ‘द परफेक्शनिस्ट’ आमिर खान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे. लवकरच तो एका मोठ्या प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आमिर खान त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’ला मोठ्या पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहेत. याचा खुलासा एका मीडिया मुलाखतीत आमिर खानने केला आहे.
‘महाभारत’ चित्रपटाबाबत अधिक बोलताना आमिर खान म्हणाला, “‘महाभारत’ चित्रपटाचे लिखाण करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. चित्रपटात मी कोणती भूमिका करेन की नाही हे मला आता माहित नाही. कारण याची पूर्ण जबाबदारी कास्टिंग टीमची असेल. ते भूमिकांसाठी योग्य निवड करतील. ‘महाभारत’ एका भागातून सांगण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे चित्रपटाचे काही भाग करण्याचा विचार आम्ही करत आहोत. यात मी इतर दिग्दर्शकांचा सल्ला देखील घेणार आहे.”
दरम्यान, ‘महाभारत’ हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही आहे. मात्र आमिर खानचे चाहते चित्रपटासाठी उत्सुक आहेत.
आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, शेवटचा तो ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसला होता. यात करीना कपूर त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटानंतर आमिर खान यांनी ब्रेक घेतला होता.
आता तो ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटावर काम करत आहेत. ‘सितारे जमीन पर’ हा 2007 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल आहे. हा चित्रपट आमिर खान आणि किरण राव निर्मित करत आहेत. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
अलिकडेच तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याने आपल्या वाढदिवसाला गर्लफ्रेंडची ओळख चाहत्यांना करून दिली होती. वयाच्या 60 वर्षानंतर देखील पुन्हा एकदा प्रेमात पडल्याने त्याला प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते.
हेही वाचा:





