आपच्या आमदाराला ठार मारण्याची धमकी
Updated On:

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार संजीव झा यांना ठार मारण्याची धमकी मिळाली असून त्याचा तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. झा हे उत्तर दिल्लीतील संत नगर बुरारी भागाचे आमदार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गॅंगस्टर निरज बवाना याच्या नावाने झा यांना सातत्याने खंडणीसाठी धमकावले जात असल्याची तक्रार त्यांना प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे बवाना हा मोस्ट वॉंटेड गॅंगस्टर असून तो सध्या दिल्लीच्याच तिहार तुरूंगात आहे.





