नवी दिल्ली – राज्यसभेतील कामात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना बुधवारी राज्यसभेच्या या आठवड्याच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.
राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले ते 20 वे खासदार आहेत. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी आप नेत्याच्या निलंबनाची घोषणा केली. सिंह यांनी मंगळवारी सभागृहाच्या कामकाजादरम्यान खुर्चीवर कागद फेकल्याचा उल्लेख हरिवंश यांनी केला.
“शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष भडकवण्याचा दिल्लीचा डाव”
सिंग यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मांडला, तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला. निलंबित 20 सदस्यांपैकी सात टीएमसीचे, सहा खासदार द्रमुकचे, तीन टीआरएस, दोन सीपीएम आणि एक सीपीआयचा खासदार आहे. खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि सभागृहात रणनीती आखण्यासाठी आज विरोधी पक्षांची बैठक झाली.