‘आली रे आली महाराग्नी आली’! काजोलच्या दमदार लुकने वेधलं साऱ्यांचे लक्ष

Maharagni teaser| अभिनेत्री काजोल काही महिन्यांपुर्वी ‘लस्ट स्टोरीज 2’मध्ये झळकली होती. त्यानंतर तिच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच ती ‘महाराग्नी क्वीन्स ऑफ क्वीन्स’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या सिनेमाचा फर्स्ट टीझर रिलीज करण्यात आला आहे. यात काजोलचा ‘सिंघम’ लुक चाहत्यांच्या देखील पसंतीस पडला आहे.
विशेष म्हणजे यात प्रभूदेवा खलनायकच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या टीजरमध्ये दिसते की, सुरुवातीला डॅशिंग अवतारात प्रभूदेवाची एन्ट्री झालेली दिसते. तर दुसरीकडे नसीरुद्दीन शाह शेवटच्या घटका मोजताना मुलांच्या आठवणीने व्याकूळ होताना दिसतात. अशातच दुर्गामातेची पूजा सुरू असते आणि त्या दरम्यान गाडीतून काजोल उतरते. त्यानंतर ती थेट गुंडांना मारहाण करते. काजोलची हातात चाबूक घेऊन एंट्री आणि तिने केलेला अॅक्शन सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.
View this post on Instagram
‘आली रे आली महाराग्नी आली ‘ Maharagni teaser|
अजयने या टीझरला ‘आली रे आली महाराग्नी आली’ असं कॅप्शन दिलं आहे. अनेकांना हा टीझर आवडला असून बऱ्याच काळानंतर काजोलचा हा दमदार अंदाज सिनेमात पाहायला मिळणार आहे. टीझर वरून काजोल एखाद्या गँगस्टरच्या रूपात असेल असा अंदाज लावला जात आहे.
या सिनेमात काजोलबरोबर संयुक्ता, नसीरुद्दीन शाह आणि प्रभुदेवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तब्बल २७ वर्षांनंतर काजोल आणि प्रभुदेवा स्क्रीन शेअर करणार आहेत. या आधी त्यांनी तामिळ सिनेमा ‘मिनसरा कनावू’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं.
दरम्यान, चरण तेज उप्पलापती दिग्दर्शित ‘महारागनी – क्वीन ऑफ क्वीन्स’ हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु, या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा आहे. मात्र हा सिनेमा नेमका कधी रिलीज होणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.
हेही वाचा:
व्हॉट्सॲपवर व्हायरल होणाऱ्या नौतापाच्या मेसेज मागील ‘सत्य’ जाणून घ्या…





