Aaditya Thackeray : डरपोक आणि कृतघ्न लोकच पळ काढतात; तृणमूलमधील बंडावर आदित्य ठाकरेंची टीका
२०२२ मध्ये महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षात झालेल्या बंडाचा अनुभव घेतलेल्या आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) टीएमसीमधील बंडखोरांना भूतकाळाची आठवण करून दिली. पक्ष आणि ममता बॅनर्जी यांनी या नेत्यांसाठी जे काही केले, त्याची जाणीव हे बंडखोर विसरल्याचा आरोप त्यांनी केला.

Aaditya Thackeray : पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसमधील मोठ्या बंडावर ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या बंडखोर नेत्यांना डरपोक आणि कृतघ्न असे संबोधत आदित्य ठाकरे यांनी ज्यांनी ममता बॅनर्जी आणि पक्षाचे उपकार मानले नाहीत, तेच आता बुडत्या जहाजावरून पळ काढत आहेत, अशी टीका केली आहे.
२०२२ मध्ये महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षात झालेल्या बंडाचा अनुभव घेतलेल्या आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) टीएमसीमधील बंडखोरांना भूतकाळाची आठवण करून दिली. पक्ष आणि ममता बॅनर्जी यांनी या नेत्यांसाठी जे काही केले, त्याची जाणीव हे बंडखोर विसरल्याचा आरोप त्यांनी केला.
तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी थेट ममता बॅनर्जी यांना माझ्यात आणि पुतण्यामध्ये (अभिषेक बॅनर्जी) एकाची निवड करा असा इशारा दिल्यावर आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, देशातील राजकारणाची पातळी किती घसरली आहे हे यातून दिसते.
आमच्या वेळी (२०२२ च्या शिवसेना फुटीच्या वेळी) जर आम्हाला वेळेत न्याय मिळाला असता, तर आज देशात ही परिस्थिती आली नसती. ही केवळ एका पक्षांतर्गत लढाई नसून हा एक घटनात्मक मुद्दा आहे, आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून नक्कीच न्याय मिळेल, अशी आशाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.