Aaditya Thackeray : मोठी राजकीय घडामोड! आदित्य ठाकरे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळणार?
Aaditya Thackeray : पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर मोठे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी २००३ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत कार्याध्यक्ष पद तयार केले होते. त्याच पदावर आता आदित्य ठाकरे यांची निवड होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. Aaditya Thackeray
ठाकरेंच्या शिवेसेनेची बैठक पार पडणार असून, त्यामध्ये आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. रितसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करू शकतात. शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिनाला आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होतील, अशी माहिती आहे.
गेल्या काही काळापासून आदित्य ठाकरे मुंबई, ग्रामीण महाराष्ट्रातही सातत्याने दौरे करत जनसंवाद यात्रा आणि विविध सभांच्या माध्यमातून त्यांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचे काम केले आहे. Aaditya Thackeray
आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्या आदित्य ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मात्र, कार्याध्यक्ष पद मिळाल्यास पक्षाच्या मुख्य निर्णयप्रक्रियेत आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग वाढणार आहे.
२०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि राज्यभर पक्ष संघटना सक्रिय करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे म्हंटले जात आहे. याकरिता शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आदित्य ठाकरेंना पूर्ण पाठिंबा असल्याचे समजतेय. याबाबत आगामी काही दिवसांत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
Share Market Today: शेअर बाजाराला मिळाली चालना ; सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही वधारले


