Aadhaar: आता घरबसल्या बदला आधारकार्डवरील पत्ता, मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया झाली सुरू

नवी दिल्ली: आधार कार्डमधील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलण्यासाठी आता नागरिकांना आधार केंद्रावर (Enrolment Center) जाण्याची गरज राहणार नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन आधार ॲपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे आता घरबसल्या, कोणत्याही कागदपत्रांशिवाय मोबाईल नंबर अपडेट करणे शक्य होणार आहे.
मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर लवकरच ॲड्रेस (पत्ता), नाव आणि ईमेल आयडी (Email ID) अपडेट करण्याची सोय देखील या ॲपमध्ये उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा UIDAI ने केली आहे.
केवळ OTP आणि फेस ऑथेंटिकेशन –
या बदलांसाठी युजर्सना कोणत्याही दस्ताऐवजाची (Document) गरज भासणार नाही. ॲपवर OTP व्हेरिफिकेशन (वन-टाइम पासवर्ड) आणि फेस ऑथेंटिकेशन (चेहरा प्रमाणीकरण) द्वारे सर्व बदल करता येतील. यामुळे दुर्गम भागातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थलांतरित नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होईल.
Update your Address from the convenience of your home.
No more standing in the queue at the Aadhaar Centre.
Rolling out soon, Stay tuned.
Download now!
Android: https://t.co/f6QEuG8cs0
iOS: https://t.co/RUuBvLwvsQEarly adopters can share their feedback on:… pic.twitter.com/IVqpOkCrYT
— Aadhaar (@UIDAI) December 3, 2025
अशी असेल प्रक्रिया:
ॲप डाउनलोड: सर्वात आधी ‘AADHAAR’ ॲप डाउनलोड करून घ्या.
लॉगिन: आधार नंबर टाकून लॉगिन करा.
सत्यापन: नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन करा.
PIN सेट: भविष्यात वापरण्यासाठी ६ अंकी लॉगिन PIN सेट करा.
अपडेटसाठी:
-६ अंकी PIN टाकून ॲपमध्ये लॉगिन करा.
-‘सर्विसेस’ (Services) मध्ये जाऊन ‘माय आधार अपडेट’ (My Aadhaar Update) वर क्लिक करा.
-सर्वात आधी दिसणाऱ्या ‘मोबाईल नंबर अपडेट’ पर्यायावर क्लिक करा.
-आवश्यक माहिती वाचून ‘कंटिन्यू’ (Continue) वर क्लिक करा.
-सध्याचा मोबाईल नंबर टाकून OTP ने व्हेरिफाय करा.
-नवा मोबाईल नंबर टाकून तो OTP ने व्हेरिफाय करा.
फेस ऑथेंटिकेशन: कॅमेऱ्यात पाहून एकदा डोळे उघडा आणि बंद करा (Face Authentication).
शुल्क: ₹75 इतके शुल्क भरल्यानंतर तुमची मोबाईल नंबर बदलाची प्रक्रिया पूर्ण होईल.
मोबाईल नंबर अपडेट का महत्त्वाचा?
आधार कार्ड हे देशातील सर्वात मोठे ओळखपत्र असून सुमारे १३० कोटींहून अधिक नागरिकांचा डेटा याच्याशी जोडलेला आहे. मोबाईल नंबर हा याचा महत्त्वाचा भाग आहे, कारण OTP द्वारे बँक खाते, सरकारी सबसिडी, आयकर सत्यापन (Income Tax Verification) आणि डिजीटल सेवा (उदा. डिजीलॉकर) यांसारख्या सेवांमध्ये प्रवेश मिळतो. जुना नंबर बंद झाल्यास किंवा हरवल्यास अनेक समस्या येतात.
नवीन ॲपची वैशिष्ट्ये:
-UIDAI ने गेल्या महिन्यात आधार कार्डचे हे नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले आहे.
-एकाच फोनमध्ये ५ आधार: एकाच फोनमध्ये कुटुंबातील ५ लोकांचे आधार कार्ड ठेवता येतात.
फेस स्कॅन शेअरिंग: आयडी शेअर करण्यासाठी फेस स्कॅन करावा लागेल, जो पिन किंवा OTP प्रमाणे सुरक्षित आहे.
सिलेक्टिव्ह शेअरिंग: केवळ आवश्यक तीच माहिती शेअर करण्याचा पर्याय.
सुरक्षित लॉगिन: बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनने ॲप ओपन होईल.
ऑफलाइन वापर: इंटरनेट नसतानाही आधार पाहता येईल.





