Pune : गॅस नोझल उडाल्यामुळे कर्मचाऱ्याने गमावला डोळा
Updated On:

पुणे : दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला त्याचा डोळा कायमचा गमवावा लागला. ही घटना तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर घडली.
याप्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरे व राहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध सहकार नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हर्षद गणेश गेहलोत (रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) या कर्मचाऱ्याला डोळा गमवावा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षद हे पंपावर सीएनजी भरण्याचे काम करतात. रविवारी सायंकाळी ते एका दुचाकीमध्ये गॅस भरत होते. या वेळी अचानक गॅसचे नोझल त्यांच्या तोंडावर उडाले. यामध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन त्यांना डोळा गमवावा लागला. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप चव्हाण तपास करत आहेत.





