पळसदेव, (वार्ताहर) – जिल्हा परिषद शाळा शेलारपट्टा येथे विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक ,पेन व पेन्सिल , खाऊ वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी जंगी स्वागत झाल्याने विद्यार्थी भारावून गेले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलारपट्टा येथे इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे औक्षण करून शाळेत प्रवेश देण्यात आला. त्या वेळी त्यांना खाऊ फुगा दिल्यामुळे मुलं भारावून गेली. या वेळी तसेच शाळा पूर्वतयारीचा मेळावा क्रमांक 2 देखील उत्साहात संपन्न झाला. या वेळी संपूर्ण शाळा पताका व फुग्यांनी सजवण्यात आली होती. त्यामुळे शाळेचे बदललेलं रूप पाहून मूल भारावून गेली. या वेळी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विध्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. या वेळी अश्विनी नरखेडकर यांनी ग्रामस्थांना गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तू बाटली, छत्री, रेनकोट ,दप्तर यांसारख्या वस्तू वाटप करण्यासाठी आवाहन केले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ इंजे, जय हनुमान मंडळाचे अध्यक्ष रमेश पवार, मुख्याध्यापक अश्विनी नरखेडकर, पंकजकुमार पैठणकर, सोमनाथ माने, पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव पूजा पवार, विठ्ठल इंजे, रमेश सलगर,रामदास पवार, शीतल इंजे, दिपाली इंजे सह पालक व विध्यार्थी उपस्थित होते.