Milind Narvekar : ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं ट्वीट ठरलं चर्चेचा विषय; नार्वेकरांनी पुन्हा केलं रश्मी शुक्लांचं अभिनंदन म्हणाले…
Milind Narvekar : एकीकडे या घडामोडींची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या विश्वासू समजल्या जाणारे आमदार मिलिंद नार्वेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Milind Narvekar : एकनाथ शिंदे यांनी अॅापरेशन टायगर अंतर्गत उबाठा गटाच्या सहा खासदारांना गळाला लावले. यानंतर राजकारणात मोठी उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. बंडखोरी केलेल्या सहा खासदारांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश मिळाला; पण या गटाला अधिकृत मान्यता मिळणे बाकी होते. यासाठी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या आणि अखेर बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी मान्यता दिली.
सध्या राज्याच्या राजकारणात अॅापरेशन २.० ची चर्चा सतत होतच असते. ठाकरेंची साथ सोडून अनेक नेत्यांनी शिंदेंची साथ दिली आहे. एकीकडे या घडामोडींची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या विश्वासू समजल्या जाणारे आमदार मिलिंद नार्वेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे त्यांच्या एक्सवरील एका ट्वीटमुळे.
खरंतर दोन महिन्यांपूर्वूी मिलिंद नार्वेकर यांनी एक्सवरुन महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देणारे ट्वीट केले होते. ‘माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!’ या ट्वीटनंतर याविषयी बरीच चर्चां रंगली होती. आता पुन्हा एकदा नार्वेकरांनी रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देणारे ट्वीट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकायुक्त सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल माजी पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती रश्मी शुक्ला जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या या नवीन जबाबदारीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. असे म्हटले आहे.
Heartiest congratulations to Smt. Rashmi Shukla ji, former DGP, on being sworn in as a Member of the Maharashtra Lokayukta. Wishing her every success in this new responsibility. pic.twitter.com/0Ri56pi4en
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) August 15, 2026
अगोदर सदस्य पदी निवड झाल्यानंतर शुभेच्छा आणि शपथ घेतल्यानंतही शुभेच्छा मिलिंद नार्वेकरांनी दिल्या असल्याने चर्चांना उधाण आले आहे. या ट्वीटमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे असले तरी विरोधीपक्षातील नेत्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट करण्यांची मिलिंद नार्वेकरांची ही पहिलीच वेळ नाही. याअगोदर त्यांनी सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.





