पुणे | ई-टॉयलेटला वाहिली श्रद्धांजली

पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून शहरात उभारण्यात आलेल्या दोन कोटी रूपयांच्या ई- टाॅयलेट उभारल्यापासून बंदच आहेत.
या टाॅयलेटची नियमित देखभाल दुरूस्ती न झाल्याने तसेच त्याचा वापर होण्याऐवजी त्याची तोडफोड झाल्याने महापालिकेने अनेक ठिकाणची टाॅयलेट काढून टाकली आहेत.
हा निधी वाया गेल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूलाजवळील ई- टाॅयलेटला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. आम आदमी पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर , सतीश यादव, युवा अध्यक्ष अमित मस्के, प्रशांत कांबळे,
किशोर मुजुमदार काका व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, महापालिकेकडून या ठिकाणी दूर्लक्ष केले जात आल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिकेने या ठिकाणी स्वच्छ्ता करावी अन्यथा हे टाॅयलेट काढून टाकावे, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.





