video : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली ; ५० ते ६० जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

मुंबई : भिवंडीच्या वलपाडा परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
Maharashtra | A building collapsed in Bhiwandi area. 10 people feared trapped. Police team including fire brigade and disaster left for the spot.
More details awaited. pic.twitter.com/xqdw2ULtXu
— ANI (@ANI) April 29, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या कैलास नगर भागातील वलपाडा परिसरात ‘वर्धमान कंपाऊंड’ नावाची तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या खाली एक गोदाम होते. तर वरच्या दोन मजल्यावर रहिवासी राहत होते. मात्र, आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली. त्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६० रहिवासी अकडले असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी झाले असून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच काही लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





