एकदा ‘सेरा नरसिंहा रेड्डी’ चा धमाकेदार टीझर पाहाच
Updated On:

लवकरच सिनेरसिकांसाठी दाक्षिणात्य मल्टीस्टारर चित्रपट भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी स्टार “सेरा नरसिंहा रेड्डी” या चित्रपटाचा नुकताच ऑफिशल टीझर प्रदर्शित करण्यात आला. रसिम्हाच्या व्यक्तिरेखेत चिरंजीवी फार उठावदार दिसत आहे.
चित्रपटाच्या टीझर वरून हा एक ऐतिहासिक ड्रामा असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. सेरा नरसिंहा रेड्डी चित्रपटात चिरंजीवी यांच्यासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि भोजपुरी सुपरस्टार रवी किशन मुख्य भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच या चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. चित्रपटात अमिताभ यांनी नरसिम्हाच्या गुरुची भूमिका साकारली आहे. येत्या 2 ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण प्रदर्शित होणार आहे.





