Satara : साताऱ्यात विद्यार्थिनीचा खेळताना पडल्याने मृत्यू
Updated On:

सातारा : येथील एका शाळेत खेळताना डोक्यावर पडून पंधरा वर्षे वयाच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या आकस्मिक मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
ही विद्यार्थिनी यापूर्वीही दोन वेळा चक्कर येऊन पडली होती. यासंदर्भात उपचारही सुरू होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजता शाळेच्या प्रांगणात खेळत असताना पुन्हा चक्कर येऊन ती विद्यार्थिनी डोक्यावर पडली.
त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने प्रथमोपचार करून तिच्या पालकांना बोलावले. तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.





