The India Story Tralier : एका सत्यासाठीचा संघर्ष! श्रेयस तळपदेच्या ‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित
The India Story Tralier : हा सिनेमा २४ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

The India Story Tralier : कीटकनाशक शेतीमुळे निर्माण होणारे गंभीर परिणाम आणि त्यामागील धक्कादायक वास्तव मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story Tralier)या सिनेमाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा समाजासमोरील एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करत असून, सत्य, न्याय आणि संघर्षाचा प्रभावी प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. (The India Story Tralier)
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने साकारलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि निर्मितीची जबाबदारी सागर बी. शिंदे यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा २४ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (The India Story Tralier)
सिनेमातील विषय कीटकनाशकांचा वापर आणि लोकांच्या आरोग्यावर होणारे त्याचे दुष्परिणाम यावर प्रकाश टाकतो. तसेच खाद्यपदार्थांमधील वाढती भेसळ. यामुळे लोकांचे जीवन कसे धोक्यात आणत आहे आणि त्यावर यंत्रणा कशी निष्क्रिय ठरते आहे, याचे वास्तव या ट्रेलरमध्ये अधोरेखित केले आहे. ‘द इंडिया स्टोरी’ हा सिनेमा एक कोर्टरूम ड्रामा आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे एका असहाय्य वडिलांच्या भूमिकेत आहे. (The India Story Tralier)
या सिनेमाचे सहनिर्माते स्वाती विनायक सैंदाणे, अनीता जाधव, विनायक सैंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या टीममध्ये छायांकनासाठी निशांत भागवत, संगीतासाठी मंगेश धाकडे, संकलनासाठी आशीष म्हात्रे, गीतलेखनासाठी शकील आझमी आणि ध्वनी संयोजनासाठी अनमोल भावे यांचा समावेश आहे.
Banarasi Tomato Chaat: आंबट, गोड आणि तिखट चवीचा धमाका! घरच्या घरी बनवा बनारसची स्पेशल टोमॅटो चाट





