Pune Hit And Run : पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’; भरधाव ‘मर्सिडीज’ने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा जागीच मृत्यू
Updated On:

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. शहरातील नवले ब्रिज जवळ ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. नवले ब्रिज जवळ एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवले. या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. कुणाल हुशार (रा. चिंचवड) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कारमधील मद्यधुंद चालकासह चार लोकांची अद्यापही मेडिकल झालेली नाही. आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.





