राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक लागू करणार; पहिली ते नववीच्या परीक्षा ‘या’ कालावधीत होणार

Maharashtra State Board | राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी सन २०२४-२५ मध्ये वार्षिक परीक्षा आणि संकलित चाचणी दोनचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्षअखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यापर्यंत होत असतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू होतात. पण विद्यार्थ्यांची उपस्थिती पुरेशी नसते. Maharashtra State Board |
परीक्षांचे आयोजन वर्षअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होत असतो. प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत असते. त्यामुळे सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत. Maharashtra State Board |
इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याबरोबरच चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी काही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
त्यामध्ये संकलित मूल्यमापन-२ साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरून करण्यात येईल. त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घेण्याच्या सूचनाही प्रसिद्ध केल्या आहेत.
हेही वाचा :





