वाघोलीत लवकरच दुसरे लसीकरण केंद्र सुरु होणार

वाघोली – वाघोली येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांची भेट घेऊन वाघोलीमध्ये दुसरे लसीकरण केंद्र सुरु करावे यासह अन्य मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. महापौर यांनी मागणीची त्वरित दखल घेऊन महापालिका आरोग्य अधिकारी यांना लसीकरण केंद्र सुरु करणेबाबत सूचना दिल्या असल्याची माहिती पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी दिली.
वाघोली (ता. हवेली) येथील लोकसंख्या जवळपास दोन लाखांपेक्षा पेक्षा जास्त आहे. एवढ्यामोठ्या लोकसंख्येसाठी एकच लसीकरण केंद्र आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. नुकतीच वाघोली येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिकाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन वाघोली येथे दुसरे लसीकरण केंद्र चालू करणे, कचरा समस्या, भामा-आसखेड पाणी, स्ट्रीट लाईट, ग्रामपंचायतकडून मंजूर असलेली कामे परंतु महानगर पालिकामध्ये समाविष्ट झाल्यानंतर अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आदि मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. महापौर यांनी तात्काळ मागणीची दखल घेऊन वाघोली येथे लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत महानगरपालिकाचे आरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्या असल्याची माहिती संदीप सातव दिली.
यावेळी नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेवक राहुल भंडारी, नगरसेवक मारुती घुले, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव, क्रिडा आघाडी हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक, उपस्थीत होते.





