nagar | माका येथे ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू
Updated On:

सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील माका येथे ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दि. २६ मार्चच्या सकाळी १० वाजेच्या सुमारास कार्तिकी गोकुळ भताणे (वय १२) ही पांढरीपूल ते शेवगाव रोडवरून शाळा सुटल्यावर सायकलवरून घराकडे जात असताना ट्रक ( १४ ई एम ७९२७) ने मागील बाजूने जोराची धडक दिल्याने यात ती गंभीर जखमी होऊन मरण पावली.
चालक खबर न देता फरार झाला. आरोपीचालक अनिल सखाराम राठोड (रा. अंबड जि. जालना) याचेविरुद्ध मुलीचे नातेवाईक घुले यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाॅ. आप्पा तमनर हे करत आहेत.





