पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसला भीषण आग
Updated On:

पुणे – पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती येथील दत्तमंदिराशेजारी लक्झरी बसला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने बस रस्त्याकडेला घेत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, लोणी काळभोर आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.





