Earthquake In Phillipines : फिलिपाइन्स हादरलं..! 7.1 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा…

Earthquake in Phillipines : फिलिपाइन्समध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे पृथ्वी हादरली. गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:13 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू 722 किलोमीटर खोलीवर होता, जो पालेमबांगच्या किनारी शहराच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 133 किलोमीटर अंतरावर होता. एवढ्या तीव्र भूकंपामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली.
सिन्हुआ या न्यूज एजन्सीनुसार, भूकंपशास्त्र संस्थेने सांगितले की, गुरुवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार 10:13 वाजता भूकंप झाला. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट असलेल्या मिंडानाओच्या आसपासच्या प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले. वृत्तानुसार, दावो ऑक्सीडेंटल, दावो ओरिएंटल, सारंगानी, दावो दे ओरो, दावो डेल नॉर्टे आणि कोटाबाटो येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
There have been reports of an earthquake tremor felt at around 10 am in the capital today, according to individuals who spoke to the Bulletin. The tremor is reported to have affected other Southeast Asian countries, including the Philippines and parts of Malaysia. According to… pic.twitter.com/cvlnQethAp
— Borneo Bulletin (@borneo_bulletin) July 11, 2024
टेक्टोनिक भूकंपामुळे धक्के तर जाणवतीलच पण त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, भूकंपशास्त्र असे संस्थेने म्हटले आहे. भूकंपामुळे त्सुनामी येणार नाही तसेच फिलीपिन्स पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित आहे त्यामुळे येथे वारंवार भूकंप होतात, अशीही माहिती त्यांनी दिली.
त्सुनामीचा इशारा…
7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर फिलिपाइन्स सरकारने त्सुनामीचा इशारा दिला आहे. मात्र, त्याठिकाणी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती नाही. याआधी बुधवारी तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामुळे पृथ्वी हादरली होती. मंगळवारी रात्री 8.47 वाजता पहिला हादरा बसला, त्याची तीव्रता 3.5 इतकी होती. याच्या एक दिवस आधी 4 देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.





