पिंपरी | तीनशे मुला-मुलांनी रेखाटली चित्र

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – दापोडी येथील पिंपरी चिंचवड महापालिकेचे हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर व कै.एल.एस. सोनकांबळे प्रतिष्ठान यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण 300 मुला-मुलींनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन , सिकंदर सूर्यवंशी व बक्षीस वितरण समारंभ चंद्रकांता सोनकांबळे, व पुष्पलता महाकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक अनुष्का भोसले , द्वितीय क्रमांक प्रांजल तिजोरी, तृतीय क्रमांक संजना खरे, इयत्ता सहावी प्रथम क्रमांक आपुलकी कांबळे, द्वितीय क्रमांकआरोही सूर्यवंशी, तृतीय क्रमांकअक्षता साखरे,
इयत्ता सातवी प्रथम क्रमांक मधुरा खरे, द्वितीय क्रमांक जानवी धनगर, तृतीय क्रमांक अमृता ढवळे, इयत्ता आठवी प्रथम क्रमांक श्रद्धा समुद्रे, द्वितीय क्रमांक अस्मिता पवार, तृतीय क्रमांक निर्मला कामी,
इयत्ता आठवी प्रथम क्रमांक अथर्व भालशंकर, द्वितीय क्रमांक गौरव खंडागळे, तृतीय क्रमांक करण विश्वकर्मा, इयत्ता सातवी प्रथम क्रमांक प्रतीक कांबळे, द्वितीय क्रमांक गौरव शिंदे, तृतीय क्रमांक महादेव गायकवाड, इयत्ता सहावी प्रथम क्रमांक यश कांबळे,
द्वितीय क्रमांकआर्यन गायकवाड , तृतीय क्रमांक गुफरान शेख, इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक ओमकार सोलापुरे, द्वितीय क्रमांक सार्थक काची, तृतीय क्रमांक सोहम टेकवडे यांना पुरस्कार देण्यात आले.
परीक्षक म्हणून निर्मला चंदनशिव, सुनिता पाटील, सुनंदा आवळे, मालन गायकवाड, आसमा शेख, नीलम आबनावे, संपदा महाले, मंदा पारधी, किसन मिसाळ, सुनिता पाटील आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तोरणे व आभार नवनाथ डांगे यांनी मानले.





