मुख्यमंत्र्यांच्या नावाने पुण्यात उद्यान; उद्यानाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्या पुण्यात

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या ( मंगळवारी) पुण्यात येत आहेत. शिवसेना (शिंदेगट) शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी स्वखर्चातून महंमदवाडी येथे न्यातील एक्झॉटिका सोसायटीकजवळ नामदार एकनाथभाई शिंदे उद्यान साकारले असून या उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहे. या शिवाय, हांडेवाडी रस्त्यावरील जेएसपीएम महाविद्यालयाजवळील हिंदूह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फूटबॉल मैदानाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
दुपारी 3 वाजता हे दोन्ही कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच पुण्यात सार्वजनिक कार्यक्रमासाठी येणार असून या वेळी शिंदेगटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले.या शिवाय, पक्षाचे प्रमुख नेते उदय सामंत, तानाजी सावंत, शिवाजी आढळराव, अजय भोसले, किरण साळी, रमेश कोंडे, संजय डोंगरे, निलेश गिरमे यांच्यासह शहरातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.
या बाबत माहिती देताना, भानगिरे म्हणाले की, या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री स्वत: पुण्यात येत असून त्यांच्या हस्ते ही दोन्ही उद्घाटने होणार आहेत. या शिवाय, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या महाआरतीचे नियोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री येणार असल्याने उद्यानाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





