Manjusha Nagpure : चर्चेतल्याच नावाला मिळाली संधी! पुण्याच्या महापौर पदी मजुंषा नागपुरे
Manjusha Nagpure : पुणे महापालिकेवर बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची महापौर पदावर निवड झाली आहे.
Updated On:

Manjusha Nagpure : पुण्याचा महापौर कोण होणार याचा सस्पेन्स अखेर संपला आहे. पुण्यासाठी महापौर पद सर्वसाधारण गटातील महिला आरक्षित पडले होते.
यासाठी अनेक महिला नेत्यांची नावे चर्चेत होती. चर्चेतल्याच नावाला संधी मिळाली असून पालिकेवर बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या नगरसेविका मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) यांची महापौर पदी निवड झाली आहे. तर उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे.
Manjusha Deepak Nagpure
महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने केवळ निवडणूक औपचारिकता राहिली आहे. सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळाला आहे. नागपुरे या पालिकेवर सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या असून, यंदाही त्यांनी निवडणूक लढवली होती आणि बिनविरोध निवडून आल्या.





