‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील एक चूक पडली महागात; मजेशीर मीम्स व्हायरल

Gharoghari Matichya Chuli Memes Viral | स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील एक चूक नेटकऱ्यांनी हेरली आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या मालिकांचे एकत्र एपिसोड गेला आठवडाभर दाखवण्यात आले. यात मधुभाऊंना महिपतच्या गुंडांपासून वाचवण्यासाठी सायली-अर्जुन त्यांना काही दिवस जानकी-हृषीकेशकडे ठेवतात.
ऐश्वर्याला मधुभाऊंबद्दल समजते आणि ती सयाजीरावच्या मदतीने ही बाब महिपतपर्यंत पोहोचवते. कारण सयाजी आणि महिपत चांगले मित्र आहेत असे दाखवण्यात आले आहे. शेवटी मधुभाऊ मुळशीत असल्याचे महिपतला समजते आणि त्याचे गुंड मधूभाऊंना गाठतात. तेव्हा अर्जुन आणि हृषिकेश त्या गुंडाशी दोन हात करतात, मात्र त्या झटापटीमध्ये जानकीच्या हाताला गोळी लागते. त्यानंतर मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका सीनवरुन ही मालिका प्रचंड ट्रोल झाली.
जानकीच्या हाताला गोळी लागल्यानंतर हृषिकेश तिला घेऊन डॉक्टरडे जातो. पण, त्यानंतर घडलेली एक चूक काही प्रेक्षकाच्या नजेतून सुटली नाही. डॉक्टरांनी जानकीच्या ब्लाऊजवरच मलमपट्टी केल्याचा सीन मालिकेत दाखवण्यात आला आहे. हा अजब सीन पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं. Gharoghari Matichya Chuli Memes Viral |
View this post on Instagram
तसेच, ब्लाऊजवर गुंडाळलेल्या गॉज पॅडवर रक्ताचे डागही दाखवण्यात आले आहेत. हे पाहून “कोणता डॉक्टर ब्लाऊजवर थेट मलमपट्टी करतो?”, जानकीच्या ब्लाऊजला लागलं आहे की, हाताला?” असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. त्यासोबतच नेटकऱ्यांनी जानकीचे फोटो आण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या यावरील मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एका मीममध्ये या सीनसह ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधला सीन शेअर करत ‘हा करोना बॅचचा डॉक्टर आहे का, ब्लाऊजवरच मलमपट्टी कशी करतोय?’ असा प्रश्न विचारण्यात आलाआहे. हे मीम शेअर करत आणखी एकाने लिहिले की, ‘एकतर मालिका काढणारे तरी येडे, नाहीतर बघणारे तरी येडे’. मात्र त्यानंतरच्या एपिसोडमध्ये मालिकेतील ही चूक सुधारण्यात आली आहे.
हेही वाचा:
रिल बनवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बसणार फटका; देवेंद्र फडणविसांनी स्पष्ट केली भूमिका





