कोल्हापूरात शक्तिपीठविरोधात गुरुवारी होणार बैठक

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड भेटीत शक्तिपीठ महामार्गाला मुठभर शेतकर्यांचा विरोध असून सर्व आमदारांचे या महामार्गाला समर्थन असल्याचे केलेले वक्तव्य महामार्ग विरोधात शेतकर्यांची वज्रमूठ भक्कम करणारे ठरले. यासंदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी येत्या २० तारखेला कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.
महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करावयाच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये शक्तिपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे आता शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत.
पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक वीस फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे, अशी माहिती विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली.





