राहुरी : पाणी तापविण्याच्या हिटरचा शाॅक लागून विवाहित तरुणी मयत झाली. रविवारी सकाळी ६ वाजता पिंपरी अवघड येथे ही दुर्घटना घडली. आसमा कलीम पठाण (वय २८) ही विवाहित तरुणी काल सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे ऊठून पाणी तापवण्यासाठी हिटर लावत होत्या. त्यावेळी त्यांना हिटरचा जबरदस्त शाॅक बसला आणि त्या जागेवरच बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे तपास करीत आहेत. पठाण यांच्या पश्चात पती व चार मुले असा परिवार आहे.