पिंपरी | पोलीस दलात मोठे फेरबदल

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील २१ पोलीस निरीक्षक व २० इतर अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच चार अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्ष तसेच पोलीस मुख्यालय येथे संलग्न करण्यात आले होते.
त्यांचे आदेश रद्द करत त्यांना मूळ ठिकाणी पाठवण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी (दि. 12) रात्री दिले आहेत. याशिवाय नियंत्रण कक्षातील नऊ पोलीस निरीक्षकांची पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत नेमणूक करण्यात आली आहे.
नेमणूक केलेले पोलीस निरीक्षक (नेमणुकीचे ठिकाण) विश्वनाथ चव्हाण (भोसरी पोलीस स्टेशन), बापू ढेरे (दिघी पोलीस स्टेशन), संदीप घोरपडे (विशेष शाखा), नीता गायकवाड (वाकड पोलीस स्टेशन), नाथा धार्गे (चाकण पोलीस स्टेशन), दीपक गोसावी (चिंचवड पोलीस स्टेशन), निलेश वाघमारे (निगडी पोलीस स्टेशन), रणजीत जाधव (तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन), अरविंद पवार (विशेष शाखा)
पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा तसेच गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. बदली झालेले पोलीस निरीक्षक (कोठून-कोठे) गोरख कुंभार (गुन्हे शाखा-वाकड पोलीस स्टेशन), सुहास आव्हाड (गुन्हे शाखा-पिंपरी पोलीस स्टेशन), विजयकुमार वाकसे (वाहतूक शाखा-देहूरोड पोलीस स्टेशन), रूपाली बोबडे (विशेष शाखा-वाहतूक शाखा),
नितीन फटांगरे (भोसरी पोलीस स्टेशन-रावेत पोलीस स्टेशन), महेंद्र कदम (रावेत पोलीस स्टेशन-वाहतूक शाखा), रविकिरण नाळे (वाकड पोलीस स्टेशन-सायबर पोलीस स्टेशन), अंकुश बांगर (तळेगाव एमआयडीसी-वाहतूक शाखा), प्रवीण कांबळे (विशेष शाखा-महाळुंगे पोलीस स्टेशन), विजय ढमाळ (दिघी पोलीस स्टेशन-गुन्हे शाखा)
दोन निरीक्षकांच्याही बदल्या
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. आहे. त्यांच्याजागी नव्याने गुन्हे शाखेत बदली झालेल्या पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन, विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पाच सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या
बदली झालेले सहायक पोलीस निरीक्षक (कोठून-कोठे) सचिन कदम (देहूरोड पोलीस स्टेशन-गुन्हे शाखा),
संदीप देशमुख (पिंपरी पोलीस स्टेशन-रावेत पोलीस स्टेशन) गणेश लोंढे (विशेष शाखा-वाहतूक शाखा), नकुल न्यामणे (आळंदी पोलीस स्टेशन-चाकण पोलीस स्टेशन), राम गोमारे (हिंजवडी पोलीस स्टेशन-गुन्हे शाखा)
सहा उपनिरीक्षकांच्या बदल्या
बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक (कोठून-कोठे) किरण शिंदे (महाळुंगे पोलीस स्टेशन-विशेष शाखा), अशोक केंद्रे (भोसरी पोलीस स्टेशन-शिरगाव पोलीस स्टेशन), बालाजी जोनापल्ले (भोसरी पोलीस स्टेशन-वाकड पोलीस स्टेशन), सूर्यभान कदम (सांगवी पोलीस स्टेशन-नियंत्रण कक्ष), मुकेश मोहारे (भोसरी पोलीस स्टेशन-तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन), संतोष डोलारे (नियंत्रण कक्ष-वाहतूक शाखा)
तीन अधिकाऱ्यांचे संलग्नतेचे आदेश रद्द
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक सतेज जाधव यांची मुख्यालय येथे संलग्न करण्यात आले होते.
तर पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख यांची पिंपरी पोलीस स्टेशन ते वाकड पोलीस स्टेशन अशी बदली झाली होती. हे सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत.





