केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 1 ऑगस्ट मुस्लीम महिला हक्क दिवस म्हणून पाळणार
Updated On:

नवी दिल्ली – तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू झाल्याचे स्मरण म्हणून, उद्या म्हणजेच एक ऑगस्ट 2021 हा दिवस देशभरात, “मुस्लीम महिला हक्क दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा करताना सांगितले की केंद्र सरकारने एक ऑगस्ट 2019 रोजी देशात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू केला होता. या कायद्यामुळे तिहेरी तलाक ही सामाजिक कुप्रथा आता फौजदारी गुन्हा समजला जातो.
हा कायदा लागू झाल्यापासून देशात, तिहेरी तलाक च्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. देशभरातील मुस्लीम महिलांनी या कायद्याचे स्वागत केले आहे. देशातील विविध संघटना, एक ऑगस्ट हा दिवस, मुस्लीम महिला हक्क दिवस साजरा करणार आहेत.





