सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता : देवेंद्र फडणवीस
Leader ,Grassroots Workers, Devendra Fadnavis

भारतीय राजकारणात आपल्या अभ्यासू वृत्तीने, प्रशासकीय पकडीने आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या घट्ट नात्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस. सध्या महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून आपली तिसरी टर्म गाजवणारे फडणवीस यांना भाजप कार्यकर्ते आणि समर्थक एक अत्यंत लाडके, गतिमान आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व मानतात.
त्यांची तळागाळातील राजकीय पार्श्वभूमी, सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारी नेतृत्वशैली आणिजमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी असलेला सततचा संवाद यांमुळे त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता ही सार्थ ओळख मिळाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास हा कोणत्याही घराणेशाहीशिवाय, केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर आणि पक्षावरील निष्ठेवर उभा राहिलेला आहे. प्रारंभिक काळात त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नागपूरमध्ये भाजपचे एक सामान्य कार्यकर्ते आणि महापालिकेचे नगरसेवक म्हणून केली.
पक्षाचे अगदी खालच्या स्तरापासून काम केल्यामुळे त्यांची एक कार्यकर्ता म्हणून झालेली जडणघडण आणि कार्यकर्त्याच्या असलेल्या व्यथा, अडचणी किंवा अपेक्षा याची त्यांना अर्थातच उत्तम जाण आहे. असेही भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणूनच ओळखला जातो. राजकीय वरदहस्त नसतानाही या पक्षात सामान्य कार्यकर्ता थेट राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधानही होऊ शकतो हे सगळ्यांनी पाहिले आहे.
देवेंद्र फडणवीस आज ज्या पदावर पोहोचले आहे तेथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची योग्यताच कारणीभूत ठरली आहे. एक अभ्यासू व्यक्तीमत्व आणि आक्रमक कार्यशैलीच्या जोरावर ते अगदी कमी वयात नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. बहुदा हा राज्यातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक विक्रम होता. नगरसेवक ते महापौर आणि आमदार असा यशस्वी टप्पा पार करत त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रगती केली. प्रदेश भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्षही झाले आणि त्या पदावर आपली छाप सोडत अखेर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली.
कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ आणि जनतेशी संवाद
नागपूरच्या रस्त्यांवरून एका सामान्य कार्यकर्त्याच्या रूपात प्रवास सुरू केल्यामुळे फडणवीस यांना जमिनीवरील वास्तव आणि सामान्य पक्षकार्यकर्त्यांच्या अडचणींची उत्तम माहिती आहे. सरकार आणि नागरिक यांच्यातील खरा दुवा म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते असतात. कार्यकर्ताच समाजात काय चालले आहे ते नेत्यांपर्यंत पोहोचवत असतो.
सरकार आणि जनता यांच्यात पुलाचे काम कार्यकर्ता करत असतो. हा विचार फडणवीस नेहमीच मांडतात. यामुळे पक्षातील शेवटच्या घटकालाही आपले महत्त्व जाणवते आणि राज्याच्या विकासात आपली भूमिका मोलाची आहे असा विश्वास त्यांच्यात निर्माण होतो. ग्रामीण भाग असो वा शहरी, सर्वसामान्यांसाठी त्यांची सहज उपलब्धता हे त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य गमक आहे. केवळ राजकारणच नव्हे, तर प्रशासन चालवण्यातही त्यांचा हातखंडा आहे.
समृद्धी महामार्गासारखे भव्य प्रकल्प असोत की शहरांमधील मेट्रो नेटवर्क, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पारदर्शकता आणण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. महाराष्ट्रातील बहुपक्षीय युतींचे यशस्वीपणे नेतृत्व करत, राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याच्या विक्रमांच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे.
त्यांनी कायद्याची पदवी घेतली असून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय त्यांनी जर्मनीतील बर्लिन येथून प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमा प्राप्त केला आहे.
त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासातील पुढाकारासाठी आणि प्रशासकीय कौशल्यासाठी त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये विकासातील उत्कृष्ट नेतृत्वाचा पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट यांसारख्या बहुमानांचा समावेश आहे.
कार्यकर्त्यांचा अथांग विश्वास
निवडणुकीतील विजयांचे क्षण असोत वा पक्षासमोरील आव्हानांचे प्रसंग, भाजप कार्यकर्ते नेहमीच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभे राहतात. त्याचे कारण फडणवीस यांनी त्यांच्या स्वत:त आणि कार्यकर्त्यांमध्ये कधीच अंतर येऊ दिले नाही.
प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करणारा नेता आणि कार्यकर्त्यांत रामणारा नेता ही केवळ त्यांची प्रतिमाच नाही तर ती वस्तुस्थिती आहे व उभ्या महाराष्ट्राने ती पाहिली आहे. त्यामुळेच फडणवीसांचा राज्याच्या राजकारणाच्या मुख्य पटलावर उदय झाल्यानंतर भाजपच्या खात्यावर एकामागून एक नव्या विजयाची नोंदच होत गेली.
प्रत्येक विजयानंतर त्यांच्या निवासस्थानी आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांकडून साजरा केला जाणारा उत्साह हा त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो. लाडक्या बहिणींचा आणि भावांचाही देवाभाऊ हे त्यांचे झालेले नामकरण किंवा त्यांना आदराने आणि प्रेमपूर्वक बहाल केलेली पदवी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते.
थोडक्यात सांगायचे तर, उत्कृष्ट प्रशासक, उच्चशिक्षित विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या सुखा-दुःखात धावून जाणारा आपला माणूस अशा विविध रूपांमुळे देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
राजकारणात वरच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी एकतर तुम्हाला घराण्याचे पाठबळ लागते किंवा तुमच्याकडे प्रचंड धनशक्ती असावी लागते. अर्थात या दोन्ही बाबी असल्या तरीही यशाची हमी देता येत नाही.
तथापि, एकदा जर तुम्ही जनतेच्या हृदयावर आपले नाव कोरले तर ते सहजी कोणाला मिटवता येत नाही. देवाभाऊंच्या बाबतीत हेच खरे आहे. याचा प्रत्यय मला स्वत:ला आला आह. माझा मुलगा आदित्यच्या विवाह सोहळयाचे निमंत्रण टिंगरे कुटूबियांच्या वतीने देण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी स्वत: लग्नाला उपस्थित राहत त्यांनी वधूवरांना आर्शिवाद दिला. माझ्या सारख्या त्यांनी दिलेला हा वेळ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी अमूल्य आणि अविस्मरणीय ठरला..
– मा. अनिल ( बाॅबी) टिंगरे
( नगरसेवक पुणे महापालिका)




