इचलकरंजीच्या पंचगंगा नदीवरील मोठा पूल खचला
Updated On:

कोल्हापूर – महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवरील मोठा पूल आज खचला असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या दोन राज्यांना जोडणारा मार्ग सुरू सुरू होण्यास यामुळे पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. गेली बारा दिवस हा मार्ग बंद होता.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवर दोन पूल आहेत, त्यातील छोटा पूल हा सुमारे 70 वर्षांपूर्वीचा आहे. तर मोठा पूल 1986 मध्ये पूर्ण झाला आहे. हा पूल यापूर्वीसुद्धा मध्यभागी एकदा खचला होता. त्यावेळी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. गेले दहा ते बारा दिवस पुराच्या प्रचंड पाण्यामुळे हा मार्ग बंद होता. आज या मार्गावरील पाणी कमी झाले मात्र या पुलावर सुमारे तीन ते चार फूट कचरा साठला होता. हा कचरा काढण्याचे काम आज नगरपालिकेने सुरू झाले, त्यावेळी हा पूल मोठ्या प्रमाणात खचला असल्याचे स्पष्ट झाले.





