नाशिकमधील झोपडपट्टीस भीषण आग
Updated On:

नाशिक – नाशिकमधील एका झोपडपट्टीत भीषण आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे. गंजमाळ येथील भीमनगर झोपडपट्टी भागात भीषण आग लागली असून याची माहिती मिळताच अग्निशमन दल १० गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझविण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गंजमाळ परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने आग काही वेळातच आसपासच्या घरांमध्ये पसरली. या आगीमध्ये २५ ते ३० घर जळाली आहेत.
दरम्यान, आगीचा विळखा गावाला पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.





