केरळमधील मशिदीत हिंदू विवाह पडला पार; ए.आर रेहमान यांनी शेअर केला व्हिडीओ

केरळ – ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात केरळमध्ये धर्मांतर करून दहशतवादाच्या आगीत फेकल्या गेलेल्या मुलींची कहाणी मार्मिक पद्धतीने मांडण्यात आली आहे. काहींनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका सोशल मीडियाद्वारे केली आहे. तर काही जण या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
एकीकडे हा वाद सुरू असतानाच गायक ए.आर. रेहमान यांनी केरळमधील एका हिंदू जोडप्याच्या विवाहाचा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या जोडप्याने केरळमधील एका मशिदीमध्ये विवाह केल्याने याची सध्या जास्तच चर्चा रंगली आहे. ए. आर. रेहमान यांनी हिंदू जोडप्याच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “ही पाहा केरळची आणखी एक कहाणी. शाब्बास… मानवतेवरचं प्रेम बिनशर्त असलं पाहिजे”.
या व्हिडीओमध्ये हिंदू जोडपं मशिदीमध्ये लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. या लग्नसोहळ्यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिल्याचेही दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वधूच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे केरळच्या अलप्पुझा शहरातील एका मशिदीमध्ये या जोडप्याच्या लग्नाची व्यवस्था केली होती. मात्र हा व्हिडिओ शेअर करत ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे समर्थन केल्याप्रकरणी ए. आर. रेहमान यांना ट्रोल केले जात आहे.
Here is another #KeralaStory pic.twitter.com/lBUojZ0K3T
— Comrade From Kerala 🌹 (@ComradeMallu) May 3, 2023
काय आहे केरला स्टोरीमध्ये नेमकं?
मुलींचे धर्मांतर त्याभोवती फिरणारे राजकरण तसेच त्यात अडकलेल्या मुलीची व्यथा तसेच तिच्या कुटुंबाला सहन करावा लागणार त्रास हे सर्व केरला स्टोरीमधून उलगडणार आहे. केरला स्टोरीमधून बेपत्ता झालेल्या 32 हजार महिलांबाबतची कहाणी सर्वांसमोर येणार आहे .हा चित्रपट आज 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.





