Ashok Chavan on Rohit Pawar । नांदेडमध्ये काल भाजपचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी भाजपा नेते राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यानिमित्त आयोजित सोहळ्यात चव्हाण यांनी आपल्या भाषणात राम शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी राम शिंदे यांना कर्जत-जामखेड मतदारसंघात सलग दोन वेळा पराभूत करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. Ashok Chavan | मी कर्जत जामखेड मतदारसंघात गेलो होतो तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो. पण तेव्हा लोक मला कानात सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस राम शिंदेंच आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. यावर आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, विधानपरिषद, राज्यसभेत जाण्यासाठी मला कुणालाही शरण जावं लागलं नाही, हे खरं आहे की नाही? तुम्हीच सांगा, असे म्हणत अशोक चव्हाण यांना प्रयुत्तर दिले. Rohit Pawar | खरा माणूस राम शिंदे : अशोक चव्हाण अशोक चव्हाण म्हणाले की, राम शिंदे हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. हा खूप अवघड मतदारसंघ आहे. मध्यंतरी रोहित पवार यांनी मला त्या मतदारसंघात बोलावले होते. मी त्या मतदारसंघात गेलो मात्र, तिथे लोक माझ्याकडे येऊन माझ्या कानात सांगत होते की, या ठिकाणी खरा माणूस राम शिंदे आहे. म्हणजेच जनमानसाचा राम शिंदेंना पाठिंबा असल्याचे आशोक चव्हाणांनी म्हटले होते. Ashok Chavan | रोहित पवारांची प्रतिक्रिया यावर रोहित पवार म्हणाले की, विचारधारेशी निष्ठा नसेल तर राजकीय अनुभवाला काहीच अर्थ राहत नाही, ही पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या आमच्यासारख्या नव्या पोरांची आपल्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांकडे तक्रार आहे. परंतु, अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि निष्ठा एवढ्या लवकर बदलतात हे पाहून आमच्यासारख्या कार्यकत्यांना दुःख होते. विधान परिषदेवर अथवा राज्यसभेत जाण्यासाठी मला कोणालाही शरण जावे लागले नाही, हे खरं आहे की नाही, तुम्हीच सांगा, असं म्हणत रोहित पवारांनी अशोक चव्हाणांना चिमटा काढला होता. Rohit Pawar | त्यांच्या वयाएवढा माझा अनुभव, अशोक चव्हाणांचा पलटवार त्यानंतर पुन्हा अशोक चव्हाणांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, माझ्या जिल्ह्यात सभापती आले होते. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करणे, त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात वाईट काय? मी त्यांच्याबद्दल चांगलं बोललो तर त्यात कोणालाही वाईट वाटण्याचं कारण नाही. तसेच राज्यसभेत जाण्यासाठी मी शरण जाण्याचा प्रश्नच येत नाही. रोहित पवार कदाचित विसरले असतील की मी यापूर्वी लोकसभेत होतो, विधानसभेतही होतो. त्यांचं जेवढं वय आहे तेवढा माझा राजकीय अनुभव आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी पुन्हा रोहित पवारांना जोरदार टोला लगावला. Ashok Chavan |