प्रभात वत्तसेवा यवत – दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंग आणि अत्याचार केल्याप्रकारणी यवत पोलिसांनी एका नराधमास ताब्यात घेतले असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. याबाबत त्यां अल्पवयीन पिडीत मुलीच्या आईने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे.याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.२९) ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजता सदर आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरात आला होता. त्यावेळी त्याने तिच्या मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. यां घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यवत पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीस तात्काळ पुण्यातून अटक केली असून त्याला न्यायाल्यासमोर हजर केले असून त्यास दि.४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे. “जातीय तेढ निर्माण होईल, असे कोणीही वर्तन अथवा आक्षेपार्ह सोशल मीडियावर कोणीही टाकू नये. सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याची सर्वानी दक्षता घ्यावी. व्हाट्सअप ग्रुप अॅडमिनने आपल्या ग्रुपमधील सभासदांना योग्य त्यां सूचना देऊन कोणताही जातीय सलोखा बिघडवणारा मेसेज पसरवू नये. यासाठी आपल्या ग्रुपची सेटिंग बदलून “ओन्ली अॅडमिन” करण्यात यावी.” – नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, यवत पोलीस ठाणे